Monday 1 August 2016

सकाळ १६- नाती- कर्मसंचय — आणि आध्यात्म Please SHARE if you believe it can help some one

सकाळ १६- नाती- कर्मसंचय — आणि आध्यात्म Please SHARE if you believe it can help some one

“डॉकटर मला घटस्फोट घ्यायचा आहे, पण माझा नवरा माझ्या कर्मामुळे मला मिळाला आहे. सगळे म्हणतात जर ह्या जन्मी मी त्याला सोडले तर पुढच्या जन्मी परत मला कर्म पूर्ण करायला.
त्याच्या सोबतच याव लागेल. त्या पेक्षा आता जसं आहे तसं निभावून घे. पण त्याच्या सोबत राहणं खरंच कठीण आहे. सारखा भांडतो, मारतोही, मुलांच्या समोर अपमान करतो.”
इतक्यात अश्याच ४-५ कहाण्या ऐकण्यात आल्या. वर्षानु वर्ष एक ना अनेक कारणांनी चुकीच्या लग्न संबंधात अडकलेल्या जोडप्याना एकत्र ठेवण्याचे समाजाचे आणखी एक कारण मला आश्यर्यचकित करून गेले. म्हणजे आता लोकांना आध्यात्मा बद्दल जागरूकता येऊ लागल्या मुळे आध्यात्माचाही वापर करायला आपण पुढे मागे पाहात नाही. गम्मतच आहे खरी.
नाती तुटायला नको हे खरं. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणे हि गरजेचं आहे. पण त्याही नंतर जर एक किंवा दोघे सतत अतिशय दुःखी असतील तर काय करायला हवे? शारीरिक आणि मानसिक प्रताडणेतच जगावे असा अलिखित फर्मान का आहे आपल्या समाजात? आणि त्याला पाठींबा म्हणून आपण अध्यात्म आणि देवाच्या नावाखाली दडपण आणायला आणि भय दाखवायलाही कमी करत नाही!
कर्माचं चक्र आहे. पण ते आपल्या गतीने फिरत आहे. बायकोला मारणारा नवराही कर्म संचय करतोच आहे ना? मग त्याला ह्या पासून वाचवायला त्याच्या पत्नीला त्याच्यापासून दूर जायचा सल्ला कुणी का देत नाही? पत्नीने मार खात तिथेच राहायचं ह्यात कुठलं अध्यात्म आहे?
मनुष्य धर्माचं पहिलं कर्तव्य- मिळालेलं आयुष्य प्रेम, आनंद आणि आंतरिक शातंतेत व्यतीत करावं. त्याच वेळी कुणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये हे जितकं महत्वाचं आहे तितकंच हे हि महत्वाचं आहे कि परमात्म्याचे देणे असलेल्या आपल्या ह्या शरीराला आणि मनालाहि विनाकारण इजा होऊ नये. तसे झाल्यास तो हि निर्मात्याचा अपमानच आहे.

कर्माचं चक्र चालताच राहणार. ते आपल्या हातात नाही .कशाचा कसा हिशेब होणार आहे ते समजण्याची आमची पातळी नाही. आपले लक्ष प्रेम, आनंद आणि आंतरिक शांततेकडे केंद्रित असायला हवे. कुणाला इजा करू नये, पण विनाकारण इजा करून हि घेऊ नये.
नाती आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी असतात. त्या प्रगतीला मदत होईल असे लोक आपल्या आयुष्यात येतात. प्रेम आणि शांतता कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. पण जिथे दोघेही बदलायला आणि एकमेकांची काळजी घ्यायला तयार नसतील तिथे त्या दुःखातून मिळालेले धडे जमा करावे आणि त्यासाठी त्या व्यक्तीला आणि परमेश्वराला धन्यवाद देऊन आयुष्यात पुढे जावे.
अध्यात्मा मध्ये शिक्षा, सूड, अश्या नकारात्मक भावनांना जागा नाही. कर्माचे चक्र हि आत्म्याच्या प्रगती साठीच. जीवन सुंदर आणि सकारात्मकरित्या जगायला अध्यात्मिक संकल्पना समजायला हवी. कधी कधी नाती जुळतात पण जमत नाही. पण नातं जोडलं म्हणून अगदी रोज भांडून, छळ सहन करूनही ते नातं निभवायचंच असं कुठल्या ग्रंथात म्हंटले आहे? एक मेकांना सांभाळुन जगायचा प्रयत्न करावा. पण प्रयत्ना अंतीही ते शक्य नसेल तर एक मेकांना प्रेमाने आशीर्वाद देऊन, आयुष्यात मिळालेल्या अमूल्य शिकवणी साठी नतमस्तक होऊन, पुढची वाट शोधावी.

No comments:

Post a Comment